स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणाऱ्या, करुणा आणि मानवता यांना पारख्या न झालेल्या हिंदी साहित्याने मला खूप प्रभावित केलं…

हिंदी नियतकालिकांचा शोध लागला आणि त्यांच्या श्रीमंतीने मी हरखून गेलो. या साहित्याचं स्वरूपसुद्धा अनोखं होतं. महाराष्ट्रातल्या महामानवांच्या विचारांचा मुख्य धारेतल्या मराठी साहित्याला किती स्पर्श झालाय, हे पाहू गेल्यास हाती काय लागेल? याउलट, अशा सुधारकांच्या बाबतीत जे पिछाडीला आहेत, असं आपल्याकडच्या अहंकारातून मानलं जातं, त्या हिंदी भाषकांचं साहित्य बव्हंशी पुरोगामी, प्रगतिशील असल्याचं मला आढळलं.......